माझे गाव

नागराळे,

ता. पलूस, जि. सांगली.

प्रस्तावना–

नागराळे गांव कृष्णा नदीच्या तीरावर वसले असून गावाची स्थापना इंग्रज राजवट येणेपूर्वी झालेली आहे. सुरुवातीच्या काळीत ननावरे समाज, लष्करी अळी, जाधव समाज व चव्हाण असे सर्वजण मिळूण एकत्रित वसाहत म्हणजेच नागराळे गाव होय.

नागराळे गावातील ग्रामदैवत भैरवनाथ असून ग्रामदेवतेची स्थापना व मंदीराच बांधणीचे काम 1919 साली सांगली संस्थानाने केले. सांगली संस्थानचे संस्थापक आप्पासाहेब पटवर्धन यांच्या खास मर्जीतील व अधिपत्याखालील गाव म्हणून नागराळे गावची ख्याती आहे.

नागराळे गावाच्या ग्रामपंचायतीची स्थापना 1954 साली श्री. आण्णासाहेब गोपाळराव चव्हाण यांच्या अधिपत्याखाली झाली. त्यांचे बंधू श्री विष्णूपंत गोपाळराव चव्हाण हे कुस्तीक्षेत्रातील प्रसिध्द मल्ल असून त्यांनी कुस्तीक्षेत्रात पहिले हिंद ही पदवी संपादन केलेली असून ते पै. विष्णूपंत नागराळे हया नावाने अखंड भारतभर परिचीत होते. त्यांचे समकालीन व त्यांच्यानंतर पै. शामराव पाटील, पै. भिमराव पाटील हयांनी नागराळे हे गावाची परंपरा चालू ठेवलेली होती.

नागराळे गाव हे अजूनपर्यंत कुंडल पलूस किर्लोस्करवाडी या क्षेत्रातील पहिले गाव म्हणून परिचित आहे. गावात चव्हाण पाटील गायकवाड मस्के हजारे खांडेकर मुल्लानी सपकाळ सूर्यवंशी नाकीळ पवार दूधाचे पवार इ. आडनावांची विविध जाती धर्मातील लोक एकदिलाने राहतात.