व्यक्तीमत्वे

  • कै. आण्णासाहेब गोपाळराव चव्हाण– गावाच्या प्रगतीचा ध्यास असणारे उत्तुंग व्यक्तीमत्व नागराळे गावाचे पहिले सरपंच मे 1954 ते 1966 या कालावधीत सरपंच म्हणून कारकीर्द केलेली असून त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी गावात हायस्कूल व तलाठी शाळांची स्थापना केलेली होती.

 

  • कै. भगवानराव भाऊसाहेब पाटील– हे अण्णासाहेबानंतर सन 1966 ते 1976 या कालखंडात गावाची धुरा सांभाळणारे डाव्या क्रांतीकारक विचारसरणीचे धडाडीचे कार्यकर्ते होते त्यांना त्यांच्या कारकिर्दीत गावात भरीव अशा स्वरुपाची कामे केलेली आहेत.

 

  • दिलीप कृष्णराव पाटील– गावचे सरपंच पद भूषविलेले बॅंकेचे संचालक पद भूषविलेले. विठ्ठलराव यशवंत पाटील– हे क्रांतीसिंह नाना पाटील यांचा सहवास लाभलेले जी. डी. बापू लाड यांच्या कृपाछत्राखाली वाढलेले क्रांतीउदयोग समूहामाफर्त सातत्याने परखडपणे समाज प्रबोधानाचे विषय मांडणारे उत्तुंग व्यक्तीमत्व.

 

  • बाळासाहेब आत्माराम पाटील– शैक्षणिक क्षेत्रातील भरीव स्वरुपाचे ज्ञानसंपादन केलेले व बी. ए. पाटील या नावाने रयत शिक्षण संस्थेत व गावात परिचीत असणारे. उच्च विदया विभूषीत उत्तुंग व्यक्तीमत्व.

 

  • हणमंतराव दतात्रय चव्हाण– अलीकडच्या काळातील सन 2001 ते 2004 या कालावधीत सरपंच पद भूषविणारे गावातील विकासाची जाण असणारे.