गावचा इतिहास

गावचा इतिहास–

नागराळे गावचे ग्रामदैवताची स्थापना व मंदरी बांधणीचे काम 1919 साली सांगली संस्थानाने केले. तसेच सांगली संस्थानाचे संस्थापक आप्पासाहेब पटवर्धन यांच्या खास मर्जीतील गाव आहे. नागराळे गावची ग्रामपंचायत 1954 साली श्री. आण्णासाहेब गोपाळराव चव्हाण यांच्या अधिपत्याखाली स्थापन झाली गावाचे सुपुत्र पै विष्णूपंत चव्हाण यांनी भारताचे पहिले रुस्तुमे ए हिंद मल्ल विद्येची कुस्तीक्षेत्रातील पदवी मिळवली. त्यांनी नागराळे गाव कुस्ती क्षेत्रात नावारुपाला येण्यासाठी त्यांचे आडनाव त्यांनी पै. विष्णूपंत नागराळे असे ठेवले.

हे गाव कृष्णा नदीकाठी वसलेले सधन गाव आहे. गावाची लोकसंख्या 2001 च्या जनगणनेनुसार 2947 आहे गावाला विविध क्षेत्रातील राजकीय वारसा लाभला आहे गावचा शैक्षणिक दर्जा उंचावलेला आहे गावामध्ये पै. विष्णू नागराळे विद्यामंदीर, नागराळे यांचया नावाने स्वामी शिक्षण संस्थेची शाखा 1963 साली स्थापन झाली. तसेच राजकीयदृष्टया भिलवडी–वांगी विधानसभा मतदार संघाचे पहिले आमदारकीचे पद या गावाने भुषविले आहे. गाव शेतीप्रधान आहे. चार साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ते येते. त्यामुळे गावामध्ये ऊस या मुख्य पिकाचे उत्पादन फार मोठया प्रमाणात प्रामुख्याने घेतले जाते. गावाचे पिकावू क्षेत्र 609 हे. आहे.

गावातील सर्व धर्माचे लोक एकोप्याने राहतात व वावरतात. गावामध्ये सर्व धर्माचे उत्सव साजरे केले जातात. गावातील लोकांच्यात नैसर्गिक आपत्तीस महापूर इ. सामोरे जाण्याचे सामथ्र्य खूप आहे. सध्या लोकांनी गाव निर्मलगाव करण्याचा एकच ध्यास घेतला आहे.

राजकीय वारसा–

  • नागराळे गाव सांगली संस्थांनाच्या अधिपत्याखाली राजे आप्पासाहेब पटवर्धन यांच्या अधिपत्याखालील गाव असून नागराळे गावातील आदय श्री. आण्णासाहेब गोपाळराव चव्हाण हे संस्थानिक राजे पटवर्धन यांच्या कायम सहवासात असत त्यांच्या कारकीर्दीत महाराष्ट्राचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व स्वर्गीय वसंतदादा पाटील हे नागराळे गावास अनेक वेळा भेटी देत असत. गावातील भगवान भाऊसाहेब पाटील यशवंत बळवंत पाटील हे अण्णासाहेब गोपाळराव चव्हाण यांचे समवयस्क कार्यकर्ते होते ते डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते होते ते नेहमी कृषिसिंह नाना पाटील जे. डी. चे कार्यकर्ते होते नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या संपर्कांत असत त्यांनी गावात क्रांतिकारक व डाव्या आघाडीची विचारसरणीचा वारसा नागराळे गावात पूर्वीपासूनच जोपसलेला होतो. नागराळे गावातील अण्णासाहेब चव्हाण यांचे जेष्ठ सुपुत्र श्री. संपतराव अण्णासाहेब चव्हाण हे भिलवडी मतदार संघाचे नेतृत्व भूषविलेले पहिले आमदार होते. नागराडे गाव जिल्हात राजकीयदृष्टया संवेदनाशील गाव म्हणून गावाची ख्याती आहे.